वृत्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वृत्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रत्यक्ष प्रमाण

मनुष्याला पाच बाह्य इंद्रिये आहेत. एक अंतरिंद्रिय आहे. त्याचे नाव अंत:कारण.

पाच बाहेरील इंद्रियांनी बाह्य वस्तूंचा जो बोध होतो, तो चित्ताकडे जाताच 'हा अनुकूल का प्रतिकूल?' असा प्रश्न सूक्ष्मपणे आत तत्काळ उभा राहतो. हा जो प्रकार घडू येतो, तो सुखदुःखांच्या पूर्वी झालेल्या संस्कारांच्या आधारेच घडून येतो. मग अनुकूलाचा स्वीकार आणि प्रतिकुलाचा धिक्कार असा द्वैतात्मक चित्तवृत्तीप्रवाह संपूर्ण मानवी जीवन व्यापून बसतो. समग्र मानवी व्यापारांना संघर्षात्मक आणि परस्परसंहारी रूप येते.

योगदर्शन सांगते की 'प्रत्यक्ष' ज्ञानदेखील चित्तवृत्तींवरच आधारित झालेले असते.

योगाशिवाय सर्व दर्शने 'प्रत्यक्ष' ज्ञानास यथार्थ ज्ञान मानतात.

वृत्ती - स्मृती

अनुभवास येऊन गेलेल्या विषयांची आपल्यापासून ताटातूट न होणे व तो विषय चित्तात रेंगाळत राहणे म्हणजे स्मृती.

वृत्ती - विकल्प

शब्दज्ञानामुळे जी वृत्ती उसळते, ती वस्तूशून्य असते. अवास्तव असते. तिला असणेपण नसते. पण असणेपण आहे असते वाटते. याचे नाव विकल्प.

वृत्ती - प्रमाण

  1. प्रत्यक्ष - इंद्रियांद्वारे होणारे ज्ञान.
  2. अनुमान - धूर दिसला की तिथे अग्नी असणार.
  3. आगम - वेळ, आत्मसाक्षात्कारी व्यक्तींचे मार्गदर्शन

वृत्ती - निद्रा

निद्राकाळी 'कोणत्याही वस्तूचे भान नाही.' ही चित्ताची जी वृत्ती असते, तिला निद्रावृत्ती म्हणतात. ह्यात तमोगुण वाढला असतो. सत्व वा रज कमी झालेले असतात.

वृत्ती

वृत म्हणजे निवड करणे. आवडीनुसार निर्णय घेणे. पसंत करणे. या निवडीला येणार आकार म्हणजे वृत्ती.
  1. निद्रा
  2. प्रमाण
  3. विकल्प
  4. विपर्यय
  5. स्मृती