- पृथ्वी
- आप (पाणी)
- तेज
- वायू
- आकाश
दृश्यविलय
इंद्रियांनी पाहिलेल्या दृश्य वस्तूची प्रतिमा मन आतमध्ये तयार करते त्यास आपण अनुभव म्हणतो. अशा रीतीने प्रत्येक माणूस प्रत्यक्ष जगावर आधारलेले स्वतःचे एक खाजगी व मानसिक प्रतिमामय जग तयार करतो. ते खरे नसते. त्याचा त्याग करणे अवश्य आहे. या मन:कल्पित जगाच्या त्यागालाच दृश्यविलय म्हणतात.
Being and Becoming
मराठी भाषेमध्ये 'असणे' आणि 'होणे' अशी दोन क्रियापदे आहेत. 'आहे' हे 'असणे' याचे रूप तर 'झाले' हे 'होणे' याचे रूप आहे. 'आहे' हे रूप 'असणेपणा' म्हणजे नुसते अस्तित्व दाखवते. 'झाले' या रूपावरून बदल, विकार किंवा उत्पत्ती यांचा बोध होतो.
'असणे' या अर्थी संस्कृतमध्ये 'अस' धातू असून त्यापासून 'सत्' हे नाम बनते. 'सत्' हे विद्यमानवाचक नाम आहे. 'सत्' म्हणजे 'आहेपणा', 'असणेपणा' किंवा 'केवळ अस्तित्व'.
'होणे' या अर्थी संस्कृतमध्ये 'भू' धातू असून त्यापासून 'भव' हे नाव तयार होते. 'भव' म्हणजे ज्यात बदल होतो ते. सतत बदलणाऱ्या नामरूपात्मक विश्वाला भवसागर म्हणातात.
इंग्रजीमध्ये 'सत्' म्हणजे being आणि 'भव' म्हणजे becoming.
ज्ञान
- वस्तुज्ञान - वस्तुज्ञानामध्ये वस्तू जाणणारा मी वस्तूहून वेगळा राहतो. हे ज्ञान द्वैतयुक्त असते.
- आत्मज्ञान - आत्मज्ञानामध्ये आत्मा जाणणारा मी आत्म्याहून वेगळा उरत नाही. हे ज्ञान द्वैतमुक्त असते. या ज्ञानामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय असा भेद राहत नाही. हेच शुद्ध ज्ञान होय.
नमन
द्रष्टा-दृश्यरहित केवळ शून्यवत अवस्था म्हणजे नमन. या अशा शून्यवत अवस्थेत अहमनिष्ठ असे सर्व मनोव्यापार एका अज्ञात वा अज्ञेय पोकळीत विलीन होत असतात. ही विलिनता म्हणजे नमन.
नमन म्हणजे न-मन अथवा अ-मन.
अनाख्येय
अज
ज्याला जन्म नसतो, म्हणून मरणही नसते ते.
Popular Posts
-
मराठी भाषेमध्ये 'असणे' आणि 'होणे' अशी दोन क्रियापदे आहेत. 'आहे' हे 'असणे' याचे रूप तर 'झाले' हे ...
-
तप आणि स्वाध्याय यांच्यामुळे पूर्वसंस्कारजन्य वृत्ती निष्प्रभ होतात. त्यांच्याशी सारुप्य पावून जगली जाणारी जीवनरीत अर्थशून्य होऊन बसते. पूर्...
-
श्रवणभक्ती कीर्तनभक्ती नामस्मरणभक्ती पादसेवनभक्ती अर्चनभक्ती वंदनभक्ती दास्यभक्ती सख्यभक्ती आत्मनिवेदनभक्ती