ईश्वर विश्वाचा निर्माता नाही. पतंजलीच्या मते चेतनेचा अंतिम आविष्कार म्हणजे ईश्वर. प्रत्येक जीव, प्रत्येक वस्तू ईश्वर होण्याच्या मार्गावर आहे. ईश्वर हा अस्तित्वाचे परमस्वरुप, कळस, शिखर आहे. आरंभापासून तो सतत बीजरुपात असतो, म्हणून तोच अखेरीला उमलू शकतो. ईश्वर ही संभावना आहे. एक शक्यता आहे.
पतंजलीची ईश्वराची धारणा एकदा समजली की तुम्हाला कळेल की ईश्वर पूजा करण्यासाठी नाही. पूजेचा प्रकार एकच आहे, तो म्हणजे स्वतःच ईश्वर होणे. आता तुम्ही अप्रगट ईश्वर आहात. तुम्ही प्रयत्न करायला हवे तुमच्यातील क्षमता अंतिम बिंदूला आणण्यासाठी. म्हणजे तिचा विस्फोट होईल. ती वास्तव होईल.