मनुष्याला पाच बाह्य इंद्रिये आहेत. एक अंतरिंद्रिय आहे. त्याचे नाव अंत:कारण.
पाच बाहेरील इंद्रियांनी बाह्य वस्तूंचा जो बोध होतो, तो चित्ताकडे जाताच 'हा अनुकूल का प्रतिकूल?' असा प्रश्न सूक्ष्मपणे आत तत्काळ उभा राहतो. हा जो प्रकार घडू येतो, तो सुखदुःखांच्या पूर्वी झालेल्या संस्कारांच्या आधारेच घडून येतो. मग अनुकूलाचा स्वीकार आणि प्रतिकुलाचा धिक्कार असा द्वैतात्मक चित्तवृत्तीप्रवाह संपूर्ण मानवी जीवन व्यापून बसतो. समग्र मानवी व्यापारांना संघर्षात्मक आणि परस्परसंहारी रूप येते.
योगदर्शन सांगते की 'प्रत्यक्ष' ज्ञानदेखील चित्तवृत्तींवरच आधारित झालेले असते.
योगाशिवाय सर्व दर्शने 'प्रत्यक्ष' ज्ञानास यथार्थ ज्ञान मानतात.