Being and Becoming

मराठी भाषेमध्ये 'असणे' आणि 'होणे' अशी दोन क्रियापदे आहेत. 'आहे' हे 'असणे' याचे रूप तर 'झाले' हे 'होणे' याचे रूप आहे. 'आहे' हे रूप 'असणेपणा' म्हणजे नुसते अस्तित्व दाखवते. 'झाले' या रूपावरून बदल, विकार किंवा उत्पत्ती यांचा बोध होतो.

'असणे' या अर्थी संस्कृतमध्ये 'अस' धातू असून त्यापासून 'सत्' हे नाम बनते. 'सत्' हे विद्यमानवाचक नाम आहे. 'सत्' म्हणजे 'आहेपणा', 'असणेपणा' किंवा 'केवळ अस्तित्व'.

'होणे' या अर्थी संस्कृतमध्ये 'भू' धातू असून त्यापासून 'भव' हे नाव तयार होते. 'भव' म्हणजे ज्यात बदल होतो ते. सतत बदलणाऱ्या नामरूपात्मक विश्वाला भवसागर म्हणातात.

इंग्रजीमध्ये 'सत्' म्हणजे being आणि 'भव' म्हणजे becoming.