क्लेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
क्लेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

क्लेश - अस्मिता

दृक् शक्ती म्हणजे पाहणे ज्यामुळे संभवते ती शक्ती (द्रष्टा) आणि दर्शनशक्ती म्हणजे दृश्य वस्तू आपले रूप ज्या शक्तीमुळे दिग्दर्शित करण्यास समर्थ होते, ती शक्ती (दृश्य). या दोन शक्ती परस्परांहून भिन्न असतात. मानव हा दृक् शक्ती आणि दर्शनशक्ती या दोन शक्तींनी युक्त असा प्राणी आहे. दृक् शक्तीमुळे तो पाहू शकतो म्हणून तो द्रष्टा. आणि आपल्याच देहाला पाहू शकतो म्हणून दृश्य.

ह्या दोन शक्ती भिन्न आहेत हे माणसाच्या लक्षात येत नाही. देह, इंद्रिय, व चित्त यांच्यासहित असे जे त्याचे दृश्य रूप असते, त्याला तो ‘मी’ असे म्हणतो. आणि त्या दृश्याकडे पाहणारी अशी जी दृक् शक्ती त्याच्यात असते, तिला ही तो ‘मी’ असेच म्हणतो. या दोन्ही शक्ती एकच आहेत असे मानून चालणारी जी ‘मी’ पणाची जाणीव तिला ‘अस्मिता’ म्हणतात.

देहाबाहेर दिसणारे सर्व बाह्य दृश्य आपण निर्माण केले नाही हे त्याला जाणवते. त्याच्यापासून आपण भिन्न आहोत हेही जाणवते. पण ती भिन्नता आपल्या देहाला लावता येत नाही. ‘मी’ आणि ‘माझे घर’ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे त्याला जाणवते. पण ‘मी’ आणि ‘माझा देह’ वेगळा आहे हे त्याला जाणवत नाही.

क्लेश - अविद्या

जागृतीचा अभाव. जीवाची मोहित अवस्था.

अविद्या म्हणजे विद्यमान नाही ते. म्हणजे वर्तमानात विद्यमान नाही ते.

क्लेश - अभिनिवेश

"मी - माझेपणात" ठाण मांडून बसणे म्हणजे अभिनिवेश. ही अस्मितेची शेवटची पायरी आहे.

हा क्लेश सर्व मानवांच्या चित्तात मूळ धरून बसला असतो. विद्वान लोकही ह्याच्या पूर्ण आहारी गेले असतात.

ज्ञानविज्ञान प्राप्त करून घेणे हाच क्लेशमुक्तीचा मार्ग आहे, हा जो समज आहे, तो अत्यंत भ्रामक आहे. ज्ञानविज्ञान संपादित करत राहणे म्हणजे अभिनिवेशरूप क्लेशाला बळ मिळवून देत राहणे. म्हणून हा क्लेशमुक्तीचा मार्ग नाही. ज्ञानविज्ञानामुळे क्लेश वाढत राहतात. त्यामुळे संघर्ष, विरोध, युद्ध व संहार यांचे साम्राज्य मानवी जीवनावर अखंड पसरत राहते.


मरणाची भीती

क्लेश

वृत्तीवृत्तीमधील अंतर्विरोध वा आंतरिक संघर्ष.

विरोध, ताण , संघर्ष इत्यादी.
  1. अविद्या
  2. अस्मिता
  3. राग
  4. द्वेष
  5. अभिनिवेश